शिरोळ तालुका भाजप महिला आघाडीच्यावतीने तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना दिले निवेदन
प्रतिनिधी / शिरोळ
महाराष्ट्रात एकूण 48 महिलांवर अत्याचार झाले असून याबद्दल शिरोळ तालुका भाजपा महिला आघाडीच्यावतीने तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून राज्य शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना राज्य सरकारच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.

तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ अरुंधती संजय पाटील जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, जिल्हा चिटणीस सौ.सोनाली मगदूम यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन पार पडले. राज्य सरकारने राज्य महिला आयोग अध्यक्षपद निवड आज अखेर केलेली नाही, हे पद रिकामे राहिलेने राज्यात नंदुरबार ते कोल्हापूर पर्यंत एकूण 48 ठिकाणी महिला व युवतींवर अत्याचार करून काही ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली हे पुरोगामी महाराष्ट्रात लाजिरवाणी घटना आहेत. याच अत्याचाराच्या वाढत्या घटना रोज घडत असून आज आखेर बालहक्क समिती शासनाने अजून नियुक्ती केलेली नाही.
महिला व बालक गुंडांच्या आत्याचाराला रोज बळी पडत आहेत शासन या प्रश्नावर ढिम आहे त्याचा निषेध आज रोजी शिरोळ तालुका भाजपा महिला आघाडीच्यावतीने केला गेला. यावेळी नगरसेविका अनिता संकपाळ, कविता भोसले, जिल्हा महिला उपाध्यक्ष उज्वला बरगाले, तालुका उपाध्यक्षा श्रीदेवी कांबळे, महिला दक्षता समिती सदस्या रागिनी शर्मा, आगरच्या उपसरपंच आसिया गवंडी, माधुरी आलासकर, शोभा दाईंगडे, रामेश्वरी कांबळे, उषा कटरे, सुवर्णा पाटील वंदना पाटील, शिरोळच्या माजी सरपंच सुवर्णा, कोळी, वैशाली पाटील, आदींसह युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनुप मधाळे, जयसिंगपुर मंडळ अध्यक्ष आदी उपस्थित होते.









