वारणानगर / प्रतिनिधी
वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथे मुंबई मटक्याचा जुगार खेळााऱ्या पाच जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आसून पो.कॉ. अजिंक्य आनंदा जाधव यांनी फिर्याद नोंदवली आहे.
प्रकाश विष्णु बुचडे वय ३०, अनिकेत बळवंत कदम रा, यवलुज ता. पन्हाळा. गोविंद बाळु सांगळे वय २५,रमेश सुर्यकांत बुणे वय ४०, संकल्प धावजी मिटके वय २ ६ तिघे रा. वाडीरत्नागीरी ता.पन्हाळा हे मिटके यांच्या घरी मुंबई मटका जुगाराची आकडे लिहीलेल्या पिवळे रंगाच्या दोन चिठ्याच्या माध्यमातून जुगार खेळत होते.
यांच्याकडून रोख रक्कम १५७५५ रू. दोन मोबाईल हॅन्डसेट व साहित्य पोलीसानी जप्त केले आहे. मुंबई मटका मालक प्रकाश बुचडे याचेकडुन अनिकेत कदम हा दहा टक्के कमिशनवर दोघेजन आपले स्वताचे फायदेकरीता वाडी रत्नागिरी येथे लोकांचेकडुन जुगार खेळण्याकरीता आलेले होते त्यानी तेथील तिघाकडून मुंबई मटका जुगाराचे आकड्यावर पैसे घेवुन व देवुन जुगार खेळण्याचे चालू असताना पोलीसानी पकडले. पुढील तपास पो.ना.पाटील हे करीत आहेत .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









