शेतकरी मोर्चाचे अध्यक्ष कडाडी यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर रोजी होणारा जन्मदिवस ‘किसान सन्मान दिवस’ म्हणून भाजप रयत मोर्चातर्फे साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य शेतकरी मोर्चाचे अध्यक्ष व खासदार इराण्णा कडाडी यांनी बुधवारी सदाशिवनगर येथील भाजप बेळगाव जिल्हा कार्यालयात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता देशातील शेतकऱयांना संबोधित करणार आहेत. यांचे लाईव्ह व्हिडिओ चित्रीकरण शेतकऱयांना दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक शेतकऱयांनी उपस्थित रहावे, यादिवशी किसान सन्मान योजनेंतर्गत 18 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम शेतकऱयांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
प्रधान मंत्री किसान योजनेचा लाभ देशातील शेतकऱयांना झाला आहे. किसान पेडिट कार्ड, स्वयंम हेल्थ कार्ड, फसल विमा योजना, ऑनलाईन व्यापार केंदे, आत्मनिर्भर भारत, रयत केंदे स्थापन करून सरकारने अनेक योजना शेतकऱयांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. शिवाय देशातील कृषी उत्पन्न वाढविण्याबरोबर शेतकऱयांसाठी अनेक योजना राबवत असल्याचे कडाडी यांनी
सांगितले.
याप्रसंगी भाजप महानगर बेळगाव जिल्हा शेतकरी मोर्चाचे शशिकांत पाटील, कल्लाप्पा शहापूरकर, बाहुबली दोडनावर, भारमप्पा अशोक पाटील, हनुमंत कोंगाली, शरद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित
होते.









