वाकरे / प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे देशातील सर्व खासदारांचा निधी गोठवला आहे. तरीही जिल्ह्याच्या डीपीडिसीतून वाकरे येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी ४९ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गाव तलाव विकासासाठी शासनाच्या योजनेतून निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
वाकरे (ता. करवीर) येथील ऐतिहासिक गाव तलाव भेटीप्रसंगी खासदार मंडलिक बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच वसंत तोडकर होते. खासदार मंडलिक यांनी मंजूर केलेल्या सौर उर्जा प्रकल्पाच्या जागेची त्यांनी पाहणी केली. खा. मंडलिक यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी गाव तलाव विकासाचे काम हाती घेतल्याबद्दल कौतुक करून या तलावाची रचना पाहता गावाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक तिर्थस्थळे आणि पर्यटनस्थळे या तीर्थस्थळांचा वारसा जपल्यास कोल्हापूर जिल्हा पर्यटनदृष्ट्या नावारूपाला येईल असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्रा. वसंत पाटील यांनी खासदार मंडलिक यांनी सौरऊर्जा प्रकल्पाला निधी मंजूर केला, त्यामुळे तलाव विकासाचे काम सुरू झाले आहे.त्यातून या तलावाचे ऐतिहासिक महत्व जनतेसमोर आल्याचे सांगितले. खा. मंडलिक यांनी सौरऊर्जा प्रकल्पाला निधी दिला, त्यामुळे याचे श्रेय खासदार मंडलिक यांचे असल्याचे सांगितले. यावेळी कुंभीचे संचालक संजय पाटील, उपसरपंच शारदा पाटील,माजी उपसरपंच कुंडलिक पाटील, सदस्य विजय पोवार, महादेव पाटील, सुमन पाटील, अनिता गुरव, पोलीस पाटील सुरेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी आभार ग्रामसेवक संभाजी पाटील यांनी मानले.