प्रतिनिधी / कसबा बीड
कोगे तालुका करवीर येथे शासन नियमाप्रमाणे योग्य नियोजन करून वाईन शॉप सुरू करण्यात आले. दुकान सुरू करताना मशीनद्वारे येणाऱ्या गिऱ्हाईकास चेक करून जर त्याच्या अंगात 100 पेक्षा जास्त टेंपरेचर असेल, तर त्या गिऱ्हाईकास लाईनमध्ये उभे न करून देता डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला देण्यासाठी वाईन शॉपचा प्रतिनिधी सांगत होता.
कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवरती 22 मार्चपासून शासनाने लॉकडाऊन करून दारू विक्री बंद केली होती. पण 3 मे पासून नियमांमध्ये शिथीलता करून सोशल डिस्टन्स, सॅनीटायझर इत्यादी नियमांचे पालन करून ठराविक वेळेसाठी सर्व दुकाने सुरू करायचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला. पण त्याचा विपर्यास तळीराम यांनी तोबा गर्दी करून व काही ठिकाणी भांडणे करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कोगे गावांमध्ये शासन स्तरावरील नियमांचे योग्य पालन करून वाईन शॉप सुरु केले आहे, असे वाईन शॉप प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.