प्रतिनिधी / वाई
वाई येथील ग्रामीण रुग्णालयाच्या लगत दत्त बेकरी जवळ वडाच्या झाडाखाली संजय कृष्णा महागंडे (वय44, रा. पसरणी, हल्ली रा. बोपरडी) याचा दारू प्राशन केल्याने दि. 29रोजी सकाळी 8.30वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्याची खबर राजाराम कृष्णा महागंडे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई शहरातील धर्मपुरी येथील दत्त बेकरी जवळ वडाखाली संजय हा दारू पिऊन पडल्याची माहिती वाई येथील एका नागरिकाने फोन करून राजाराम यांना दिली. राजाराम यांनी सकाळी 8.30 ला दुचाकीवरून तेथे पोहचले. तर संजय हा निपचित पडला होता. त्यास उठवण्याचा प्रयत्न केला असता कसला ही प्रतिसाद दिला नाही. त्याच्या नाकातून रक्तही आले होते. याची नोंद वाई पोलिसात झाली असून तपास पोलिस नाईक एस. एस. वायदंडे करत आहेत.