प्रतिनिधी/ वाई
वाई शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.दुसरा दिवस असून व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी यांनी वाई शहरात सॅनिटायझर फवारणी सुरू केले आहे.दरम्यान, होम कोरोन टाइन झालेल्याना फोन करून आधार दिला जात आहे.
वाई शहरात वाढत चाललेल्या कोरोना बधिताला ब्रेक लावण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.या कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.नागरिक सहभागी होत आहेत.दुस्रया दिवशी व्यापारी महासंघाच्यावतीने शहर परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे.सनिटायझर फवारणी करण्यामध्ये व्यापारी महासंघातर्फे हेमंत येवले, भरत गांधी, भवर ओसवाल, राजू बागवान, सचिन फरांदे, उमेश शहा, प्रसाद महाडिक,पप्पू पोरे इत्यादी उपस्थित होते.बाजार पेठेत हा फवारणी करण्यात आली. वाई व्यापारी महासंघाच्या वतीने होम कॉरंटाईन झालेल्या व्यक्तींना व्यक्तिशः फोन करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात येत आहे. त्यांना आक्सीमीटरचा वापर व माहिती तसेच त्यांना आयसोलेशन संदर्भातील पुस्तिका पीडीएफ स्वरूपात पाठवण्यात येत आहे. त्यांना आधार दिला जात आहे. दरम्यान, काल रात्री आलेल्या अहवालात वाई तालुक्यातील 42 पॉझिटिव्ह आले आहेत.वाई 20 (शहर 16,शहाबाग 03 ,लाखानगर 01), अनपटवाडी 01 ,अभेपुरी 01,पांडेवाडी 01 ,कुसगाव 01 ,वरखडवाडी 04 , चिखली 02,वेळे 01,सुरुर 02 कवठे 02,जांब 07 जेष्ठ नागरिक 08 अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ.यादव यांनी दिली.








