वसगडे / वार्ताहर
पलूस तालुक्यातील वसगडे – खटाव सिमेवर महावीर पाटील यांच्या ऊसाच्या शेतात गवा रेडा बसल्याचे आढळुन आल्याने शेतकर्यांच्या मधुन घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सध्या ऊसतोडीचा हंगाम जोमात सुरु असुन ऊसतोड कामगारा बरोबर शेतकर्यांची धांदल सुरु असताना गवा रेड्याचे दर्शन झाल्याने नागरिकामधुन अस्वस्थता पसरली आहे. या परीसरात दोन वर्षापुर्वी सुखवाडी मध्ये गवा रेडा दिसुन आला होता.
वनखात्याला याबाबत कळविण्यात आले असुन सायंकाळ पर्यंत तरी वनखात्याचे अधिकारी वसगडेत दाखल झाले नव्हते. गवा रेडा शक्यतो माणसांना हानी पोहचवत नाही मात्र काळजी घेण्याचे आवाहन वसगडेच्या निसर्ग फौंडेशनचे दिपक परीट यांनी सांगीतले आहे.








