वार्ताहर /सावईवेरे :
वळवई-सावईवेरे येथील केआरएसएस हायस्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा वाहून विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकदिनात सहभाग दर्शविला.
हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रोमाना क्रास्टो यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण केला. मयुर घाडी यांनी सुविचार सांगितला. विशाखा जाण व श्रृगी तारी यांनी गीत सादर केले. मुख्याध्यापिका रोमाना क्रास्टो यांनी शिक्षकदिनाचे महत्व विषद केले. शिवानी घाडी यांनीही विचार मांडले. मृगना सावईकर, रूता चाफडकर व प्रभाकर शेटय़े या विद्यार्थ्यांनी पी.पी.टी. सादरीकरण केले. अनिशा पुजारी, जीया नाईक, मयुर घाडी, नंदन सावंत, चंदीशा वेगुर्लेकर, शिवानी घाडी, श्रेया वळवईकर विद्यार्थ्यांनी वॉटसऍप माध्यमातून सर्व शिक्षकांना शुभेच्छा कार्ड पाठवून शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सुत्रसंचालन मृगना सावईकर हिने केले. त्यानंतर शिक्षकांसाठी विविध खेळ घेण्यात आले.









