नवी दिल्ली
जून महिन्याच्या अखेरीपर्यंत एचडीएफसी बँकेकडून देण्यात आलेल्या एकूण कर्जामध्ये एक वर्षाच्या अगोदरच्या कालावधीच्या तुलनेत 21 टक्क्मयांनी वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे. यामध्ये शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार 30 जुन 2020 रोजी एकूण कर्ज वाढून 10,04,500 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. एक वर्षाअगोदर समान कालावधीत कर्ज 8,29,700 कोटी रुपयांवर होते. तर मार्चमध्ये हा आकडा 9,93,700 कोटी रुपयांवर राहिल्याचेही म्हटले आहे. बँकेचे एकूण डिपॉझिट 30 जून 2020 रोजी 11,89,500 कोटी रुपयांवर पोहचले आहे. हा आकडा 31 मार्च 2020 च्या दरम्यान 11,47,500 कोटींवर राहिला आहे तर बँकेचा कासा (करेंट अकाउंट सेव्हींग अकौंउंट) रेश्यो 30 जून रोजी 40 टक्के होता. एक वर्षापूर्वी हा टक्का 39.7 टक्के होता. 31 मार्च रोजी हा आकडा 42.2 टक्क्मयावर राहिला होता.