प्रतिनिधी /बेळगाव
कासवाची तस्करी करुन तो विक्रीसाठी नेताना वनविभागाच्या पोलिसांनी त्या ठिकाणी धाड घातली. यामुळे कासव तेथेच सोडून संशयित आरोपीने पलायन केल्याची घटना हिरेबागेवाडी जवळ घडली आहे. संशयित आरोपी विरेश बसय्या हिरेमठ (वय 28, रा. तुरकर शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल) असे पलायन केलेल्याचे नाव आहे.
विरेश हा कासव तस्करी करत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार आर. बी. यरनाळ, के. डी. हिरेमठ, बी. बी. इंगळगी यांनी हिरेबागेवाडी गावाजवळ अचानक धाड टाकली. वन विभागाच्या पोलिसांना पाहताच विरोश हा कासव तेथेच सोडून पोबार केला. पोलिसांनी कासव ताब्यात घेतला आहे.
फरारी झालेल्या आरोपी विरेश हिरेमठ याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून वन विभागाचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









