वकीलांना संरक्षण द्या बार असोसिएशनची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
तेलंगना येथील वकील व त्यांच्या पत्नीची निर्घृन हत्या करण्यात आली आहे. त्याचा बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने तिव्र निषेध करण्यात आला असून, वकीलांना संरक्षण द्यावे अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
तेलंगना येथील पिडापल्ली येथे हा खून झाला आहे. या घटनेमुळे देशामधील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. वकील हे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात मात्र त्यांच्यावर अशाप्रकारे हल्ला होत आहे. तेलंगना येथील वामन राव आणि त्यांच्या पत्नीचा खून करण्यात आला आहे. अशाप्रकारे वारंवार वकीलांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. तेव्हा वकीलांना संरक्षण द्यावे अशा मागणीचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री, कायदा मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांनाही निवेदन पाठवून देण्यात आले आहे.
सीबीआय चौकशी करावी – ज्येष्ठ वकील दिनेश पाटील
तेलंगनाचे सरकार या खून प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे करतील की नाही हा संशय व्यक्त होत आहे. याबाबत अनेक वृत्तपत्रामधून तसेच सोशल मिडियावरून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तेव्हा या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी ज्ये÷ वकील दिनेश पाटील यांनी केली आहे. सर्वसामान्य जनतेला कायद्याच्या माध्यमातून वकील न्याय मिळवून देतात. मात्र अशावेळी रागातून अशा घटना अनेकवेळा घडत आहेत. तेव्हा वकीलांना संरक्षण द्यावे यासह त्यांच्यासाठी स्वतंत्र कायद्याची तरतूदही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.









