काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांची टीका
प्रतिनिधी/ मडगाव
गेल्या नऊ वर्षात राज्यात सुरु असलेल्या अनागोंदी कारभारा विरोधात लोक आता उघडपणे संताप व्यक्त करीत आहेत. या सरकारला आता गोव्यातील जनता कंटाळली आहे. त्यामुळेच जनसामान्यांचा आवाज दाबण्याच्या विविध क्लुप्त्या आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अवलंबत आहेत. दक्षिण गोव्यात लागू केलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा याचाच एक भाग असून, सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा जनसुनावणीत लोकसहभागास अटकाव करण्यासाठीच हा कायदा दक्षिण गोव्यात लागू केला आहे अशी टीका काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे.
दक्षिण गोव्याबरोबरच लवकरच उत्तर गोव्यामध्ये सुद्धा हा कायदा लागू करण्यात येईल असा दावा राष्ट्रीय काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला. नुवे गट काँग्रेस कमिटीच्यावतीने दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित किराणा साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी परिसरातील 500 हून अधिक गोरगरिबांना आणि गरजूंना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश राठोड, दक्षिण गोवा निरीक्षक सुनील हनुमन्नवर, उत्तर गोवा निरीक्षक मन्सूर खान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा, माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. शेख, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस, नुवे गट अध्यक्ष मान्युएल डिकोस्ता आदी उपस्थित होते.
आमचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वाढदिनी कोणताही समारंभ साजरा न करता या कोविड काळात देशातील जनतेची शक्मय त्या सगळय़ा मार्गाने मदत करा असे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले होते. मला अभिमान वाटतो की, दक्षिण गोवा काँग्रेस समितीने दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम घेत नेहमीच जनतेची सेवा करण्याला प्राध्यान्य दिले अशा शब्दात दिनेश राव यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
2022 मध्ये होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष राज्यात सत्ता स्थापन करेल याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. त्यामुळे पक्ष सत्तेत आल्यानंतर राज्यातील मोटरसायकल पायलट, रिक्षाचालक, मॅकेनिक, मच्छिमार, खाजेकार, फुलकार, पोदेर, पाडेली तसेच हातावर पोट असणारे यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी दिगंबर कामत यांनी केले.
दिनेश गुंडू राव आणि इतर पदाधिकारांच्या या चार दिवसाच्या गोवा भेटीमुळे पक्षामध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. या चार दिवसात विविध मतदारसंघांना दिलेल्या भेटीमधून एक बाब प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे 2022 मध्ये काँग्रेस पक्षच सत्ता स्थापन करेल हा विश्वास लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
काँग्रेससोबत मी एकनि÷ असून दक्षिण गोव्यातील वीसही मतदारसंघामध्ये काँग्रेसचेच उमेदवार विजेते होतील यासाठी आम्ही प्रचंड मेहनत करु. दक्षिण गोवा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येणाऱया निवडणुकीत सगळे मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू असा विश्वास ज्यो डायस यांनी व्यक्त केला.









