ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी पेगासस हेरगिरीच्या वादावरून राज्यसभा आणि लोकसभेत गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या चार मिनिटांनी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. राज्यसभेचे कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.









