प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या आनंदनगर, येळ्ळूर रोड, वडगाव शाखेच्यावतीने जागतिक सायकलदिन साजरा करण्यात आला. शाखेच्यावतीने ग्राहकांना सायकल वापराबद्दल माहिती तसेच लोकमान्य सोसायटीच्या बचत सेवेबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी शाखा व्यवस्थापक मंगेश देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. सायकल चालविल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे याविषयी माहिती दिली. यावेळी अरुण अष्टेकर, सागर धामणेकर, शुभम जांबोटकर, वृत्तपत्र विक्रेते सुभाष गोरे यासह सायकल चालविणारे ग्राहक उपस्थित होते.









