योगी आदित्यनाथ सलग तिसऱयांदा अव्वल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्सने संयुक्तिकरित्या केलेल्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱयांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱया स्थानी असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाचव्या क्रमांकावर आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच राज्यात कोरोनाचे संकट ओढवले. या कठीण परिस्थितीतही कोरोनासारख्या महामारीचा सामना करणाऱया ठाकरे सरकारची कामाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. एका सर्वेक्षणातून उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत टॉप फाईव्ह मध्ये स्थान पटकावले आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’ या नावाने 15 जुलै ते 27 जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण केले होते. देशातील वेगवेगळय़ा राज्यातील ग्रामीण शहरी नागरिकांची मते जाणून घेण्यात आली.
पहिल्या क्रमांकावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता यावेळी आणखी वाढली आहे. ममता बॅनर्जी व नितीश कुमार यांची लोकप्रियता घटल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेशासित राज्यांचे आहेत.
टॉप फाईव्ह मुख्यमंत्री…
1. योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश ) 24 टक्के
2. अरविंद केजरीवाल (दिल्ली) – 15 टक्के
3. जगनमोहन रेड्डी (आंध्रप्रदेश) – 11 टक्के
4. ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) – 9 टक्के
5. उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) – 7 टक्के









