सरकारकडून सुविधा आणण्याची तयारी : सचिव अग्रवाल यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉजिस्टिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार एक डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ऍप आणण्याची तयारी करत आहे. यामध्ये कार्यक्षमता आणि ट्रान्स्पोर्टेशन दक्षता वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज मंत्रालयातील विशेष सचिव पवन कुमार अग्रवाल यांनी सांगितले आहे.
सध्या वेगाने वाढत जाणारी दळणवळणाची साधने आणि त्यासोबत प्रगत होणारी अत्याधुनिक यंत्रणा यांच्या जोरावर आगामी काळात लॉजिस्टिक क्षेत्रातील डिजिटलायजेशनचा विकास व विस्तार करण्यात येणार असल्याचे पीएडी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीच्या व्हर्च्युअल परिषदेत अग्रवाल यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊननंतर लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग क्षेत्राला सक्षम बनविण्यासाठी सरकार लॉजिस्टिक क्षेत्रात डिजिटल सुविधा आणणार आहे. यासाठी मोबाईल ऍपचा वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सदरच्या प्लॅटफॉर्मलाच वेअरहाऊसिंग इन्फॉर्मेशन टॅकिंग ऍण्ड ट्रेंडिंग यार्ड करण्यात येणार आहे. यामध्ये वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक क्षमतेसाठी मॅपिंग करण्यास मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आवश्यक सेवांना प्राधान्य
कोविडमुळे आरोग्यासह अन्य महत्वाच्या गोष्टीचे महत्व अधोरेखीत करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा आणि नियमीत पुरवठा साखळीचे महत्व पाहूनच हा बदल करण्यात येत असल्याचे पवन अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.