बेंगळूर /प्रतिनिधी
कोरोनाने देशात पाय पसरल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रसरकारने संपूर्ण देशात लॉक डाऊन लागू केला. त्यामुळे सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे. उद्योगधंदे आणि व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे देशाचेही आर्थिक गणितही विस्कटले आहे. लॉकडाऊनमुळे देशातील प्रत्येक राज्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
कोरोनामुळे कर्नाटक पर्यंटन व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योगाचे २० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. त्यामुळे बाहेरून येणारे पर्यटक नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशी माहिती कर्नाटक पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांनी दिली आहे.
सरकारने हॉटेल्स चालविण्यास परवानगी दिली असली, तरी त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे “कोरोना नियंत्रणात आल्यावर आम्ही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे मंत्री रवी यांनी म्हंटले आहे.