एप्रिलमध्ये 46.8 टक्के घट, मे मध्ये सुधारणा होण्याचे संकेत, एलपीजी मागणी वाढली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशात तिसऱया सत्रातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांसोबत अन्य क्यवसाय आजही ठप्पच आहेत. यामुळे इंधनाच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात घट नेंदवण्यात आली आहे. देशात एप्रिल महिन्यात इंधनाची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत 45.8 टक्क्मयांनी कमी राहिली आहे तर सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2020 मध्ये 9.93 दशलक्ष टन इंधनाची विक्री झाली आहे. 2007 च्या नंतर प्रथमच इतकी कमी इंधन विक्री झाली असल्याचे म्हटले आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात पहिल्या दोन आठवडय़ात सरकारी तेल विपणन कंपन्यांनी मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 50 टक्के इंधनाची कमी विक्री केली आहे. एप्रिल 2020 मध्ये मागील वर्षाच्या बरोबरीत 55.6 टक्के डिझेलची विक्री कमी झाली तर यांची एकूण विक्री 3.25 दशलक्ष टनावर राहिली आहे. देशात परिवहनमध्ये प्रमुखपणे डिझेलचा वापर केला जातो. परंतु लॉकडाऊनच्या कारणामुळे परिवहन सेवा ठप्प पडली आहे.
पेट्रोल मागणी 60.6 टक्क्मयांनी घसरली
मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात पेट्रोलची विक्री 60.6 टक्क्मयांनी घसरली आहे. याच कालावधीत एकूण विक्री 0.97 दशलक्ष टन झाली आहे. पेट्रोलचा वापर मुख्यत्वे खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी होत असल्याचे नोंदवले आहे.
एलपीजी विक्री 12.1 टक्क्मयांनी वाढली
पेट्रोल आणि डिझेल यांच्या तुलनेत एलपीजीची विक्री एप्रिलमध्ये 12.1 टक्क्मयांनी वाढली आहे. याच कालावधीत 2.13 दशलक्ष टन एलपीजीची विक्री करण्यात आली आहे. दुसरीकडे नेफ्थाची विक्री 9.5 टक्क्मयांनी कमी होत 0.86 दशलक्ष टनावर राहिली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिलच्या 15 दिवसांमध्ये 21 टक्के एलपीजीची विक्री झाली. आहे.
20 एप्रिलनंतर मागणीत तेजीः प्रधान
मागील आठवडय़ात लॉकडाऊनमधून औद्योगिक आणि परिवहन क्षेत्राला सवलती मिळाल्यामुळे इंधनाच्या मागणीत काहीशी तेजी आल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.









