नवी दिल्ली
कोरोनाच्या संकटामुळे वाढते आर्थिक संकट दिवसेंदिवस अडचणींमध्ये वाढ करत आहे. यामुळे विविध प्रकारची उपयायोजना तयार करुन आपली आर्थिक बाजू सक्षम करण्यावर नागरिक धडपडत असल्याचे दिसून येत आहे. यात देशव्यापी लॉकडाऊनच्या कालावधीत जवळपास 8.2 लाख कर्मचाऱयांनी आपला पीएफचा फंड काढला आहे. या फंडाच्या आधारे आपली गुजरान करण्यावर देशातील कर्मचारी वर्ग भर देत असल्याचे कामगार मंत्रालयाने सांगितले आहे.
खासगी पीएफ ट्रस्ट आपल्या कर्मचाऱयांना पीएफ रक्कमेचे वितरण करत आहेत आणि मासिक पीएफ परतावा दाखल करण्यासही सवलत देत आहेत आणि या प्रकारची सवलत प्रति÷ानकडून देण्यात येत असल्याचे सांगितले आहे. यात टाटा कंसलटन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नालॉजी आणि एचडीएफसी बँक या खासगी क्षेत्रातील तीन मुख्य संस्था आहेत. सार्वजनिक क्षेत्रात ओएनजीसी, नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन आणि भेल या प्रति÷ानचा समावेश आहे.









