आरोग्यमंत्री डॉ. के.सुधाकर यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रार्दुभाव झपाटय़ाने वाढत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही पण कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन करावा की नाही याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बेंगळूर येथे प्रसार माध्यमांशी संवा साधताना ते बोलत होते.
कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रूग्णालयातील आयसीयूमध्ये बेड्सची कमतरता भासत आहे. तेव्हा अधिकाधिक बेड्स उपलब्ध करून देण्यासह रूग्णांवर अधिकाधिक चांगले उपचार करण्यावर भर दिला जाईल. याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व महसूलमंत्री आर. अशोक यांच्याशीही चर्चा झाली असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.