सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या फैलाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठीच जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यात सुमारे एक कोटी 84 लाख 7 हजार 371 रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. 6 ते 27 जुलै 2020 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकी वरुन दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी 47176 प्रकरणात 73 लाख 35 हजार 701 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 12743 प्रकरणात 18 लाख 68 हजार 800 रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 3408 प्रकरणात 4 लाख 70 हजार 680 रुपयांचा दंड वसूल केला. त्याच बरोबर सोलापूर महानगरपालिकेने 7909 प्रकरणात 1 कोटी 17 लाख 2 हजार 190 रुपयाचा दंड वसूल केला
दरम्यान, आज शहरात ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त कार्यालाकडून वाहने तपासणी सुरु होती.
Previous Articleराज्यसरकारने मराठा तरुण,तरुणींची झोप उडवली – चंद्रकांत पाटील
Next Article सांगली : ताकारीत कोरोनाचा शिरकाव








