वृत्तसंस्था/ ऍम्स्टरडॅम
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या प्राथमिक गटातील सामन्यात लिव्हरपूल फुटबॉल संघाने ऍजॅक्सचा 1-0 अशा गोल फरकाने निसटता पराभव करत पूर्ण गुण वसूल केले.
या सामन्यात ऍजॅक्स संघातील बचावफळीत खेळणाऱया निकोलास टेगलियाफिको याने 35 व्या मिनिटाला आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू मारून लिव्हरपूलला बोनस गोल बहाल केला. या गोलनंतर लिव्हरपूल संघाला शेवटपर्यंत गोल नोंदविता आला नाही. ड गटातील या सामन्यात दोन्ही संघांचा खेळ आक्रमक आणि वेगवान झाला. 2019 साली लिव्हरपूल संघाने सहाव्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.









