नवी दिल्ली
स्थानिक मोबाईल कंपनी ‘लावा’ने नुकताच झेड सिरीजअंतर्गत नवा मोबाईल स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. झेड 66 या स्मार्टफोनची किंमत 7 हजार 777 रुपये इतकी असणार आहे. याला 2.5 डी कर्व्हड स्क्रीन असून 6.08 इंचाचा एचडी डिस्प्ले स्क्रीन आहे. 1.6 ऑक्टोकोर प्रोसेसरसह येणारा हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. सध्या हा फोन ऑफलाइन विक्रीला उपलब्ध असून लवकरच ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीकरीता उपलब्ध केला जाणार आहे. बेरी रेड, मरीन ब्लू आणि मिडव्हाईट ब्लू या रंगांमध्ये स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे. याला एलईडी फ्लॅशसह 13 एमपी व 5 एमपीचा डय़ुअल कॅमेरा असून 3950 एमएएच बॅटरीची सोय यात आहे.









