लातूर / प्रतिनिधी
लातूर ऑरेंज झोनमध्ये असल्याने सकाळपासून सर्वच दुकाने उघडली गेली आहेत. त्यात खरी उत्सुकता वाईन (दारू) दुकान बद्दल होती. सकाळी दारुचे दुकान सुरू झाल्याचे समजताच ग्राहकांची तुफान गर्दी केली होती. लातूर शहरातील सौदागर वाईन शॉप व एस. पी. वाईन शॉप वर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
गेल्या २३ मार्चपासून वाईन शॉप बंद होती. सरकारने परवानगी देताच खरेदी दाराची तुफान गर्दी केली. सकाळीपर्यंत शिस्तीत खरेदी सुरु होती यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत असल्याचे दिसताच पोलिस बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे समजतेय. जागतिक मंदी व कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यावर चर्चा होत असली तरी कोरोनानंतर आता वाईन शाॉप समोरील गर्दी हा चर्चेचा विषय ठरत आहे.