वार्ताहर /लाटंबार्से
मागील ग्रामसभेत सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या विविध समित्यांची निवड न झाल्याने या ग्रामसभेत सरकारच्या अधिसूचनेद्वारे विविध समित्यांची निवड हा एकच विषय ग्रामसभेपुढे होता. काही समित्यांवर ग्रामस्था?ची निवड झाल्यानंतर वॉर्ड क्रमांक 9 वर एका गटातील ग्रामस्था?नी ग्रामविकास समितीवर एका ग्रामस्थाचे त्या समितीवर नाव सुचविता ना दुसऱया गटाने साफ नकार दिल्याने दोन गटात वाद झाल्याने शाब्दकि बाचाबाची झाल्याने शेवटी पंचायत सचिवांना ग्रामविकास समिती निवड अर्ध्यावरच सोडून देवून सदर ग्रामसभा बरखास्त करावी लागली. तत्पूर्वी पंचायत सचिवांनी मागील सभेचे कामकाज वाचून कायम केले.
मागील सभेत उपस्थित काही ग्रामस्था?नी समित्यांची निवड न झाल्याने ग्रामपंचायत ग्रामातील विकासकामे करण्यासाठी सजग कशी राहील असा प्रश्न ग्रामस्था?नी उपस्थित केला होता. विविध समित्यांवर नवही वॉर्ड मधून ग्रामस्था?ची निवड करताना काही समित्यांवर याचे नाव समितीवर घाला त्याचे नाव घाला किंवा निवडताना किरकोळ गोंधळ उडाला काही समित्या निवडताना सुरळीत पर पाडल्या. काही ठिकाणी ग्रामस्था?ना हात उंचावावे लागले ज्या गटात जास्त लोक त्या गटातील ग्रामस्थाचे नाव सुचविण्यात येवून त्याची निवड करण्यात आली. विविध समित्यमधून सामाजिक न्याय समिती,शिक्षण समिती, आरोग्य विषयक समिती, कचरा विल्हेवाट समिती, प्रॉडकश् न समिती या व अशा विविध समित्यांवर ग्रामस्था?ची निवड करण्यात आली.
ग्रामविकास समिती ही महत्वाची समिती निवडताना वॉर्ड क्रमांक नवूवर समितीवर एका ग्रामस्थाची निवड करताना दुसऱया गटाने साफ नकार दिल्याने दोन गटात थोडा वाद झाला त्यामुळे पंचायत सचिवांना सदर ग्रामसभा बरखास्त करावी लागली. समिती निवडताना अनिश नाईक यांनी ग्रामस्था?ना समिती निवडीची माहिती असावी आणि कशासाठी याकरिता समितीवर किमान आणि कमाल किती जणांची समिती असावी लागते असा प्रश्नही उपस्थित केला होता. त्यावर सचिवांनी सरकारने ग्रामपंचायतीला पाठविलेल्या अधीसुचनेनुसार आलेल्या माहिती नुसार आपण वाचून दाखवीत आहे.
विविध समित्यांवर मागास वर्ग महिला, इतर मागासवर्ग, व्यावसायिक पदवी धारण केलेल्या ग्रामस्था?ची विविध समित्यांवर निवड करण्यात आली. या ग्रामसभेत सरपंच पद्माकर मलिक, उपसरपंच त्रिशा राणे,पंच दिलीप वरक, नीलम कारा पूरक र, डॉ. रामा गावकर, नरेश गावस, कुष्णा आरोलकर, हर्षदा परवार आदी पंच उपस्थित होते.









