वार्ताहर /माले
पन्हाळा तालुक्यातील माले येथे लहान भावाच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्या भावानेही प्राण सोडल्याची घटना घडली. येथील राजाराम मारूती कांबळे वय ८० वर्षे व चंद्रकांत मारुती कांबळे वय ७२ यांचे थोड्या वेळाच्या फरकाने निधन झाले. यातील लहान भाऊ चंद्रकांत कांबळे सीपीआरमध्ये मधुमेहावरील उपचारासाठी आठवड्यापूर्वी दाखल होते. त्यांचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोठा भाऊ राजाराम कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली.
हे दोघे सख्खे भाऊ एकत्र राहत होते. राजाराम हे वारणा साखर कारखान्याकडे चिटबॉय म्हणून निवृत्त झाले होते. तर चंद्रकांत कांबळे हे गवंडी काम आणि शेती करत होते. दोन्ही भावांनी स्वकष्टातून आपला संसार फूलवला होता. एकाच दिवशी दोन भावांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही बातमी समजताच ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. माझी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी अंत्यदर्शन घेतले. राजाराम कांबळे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी तर चंद्रकांत कांबळे यांना पत्नी दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









