ऑनलाईन टीम
देशात सुरू असणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. मात्र, अशा काळातही महाराष्ट्राने लसीकरणात अव्वल कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लसीचे दोन्ही डोस मिळालेले सर्वाधिक नागरिकही महाराष्ट्रात आहेत. केंद्र आणि राज्यात कोरोना लसीचे अपुरे डोस हा वादाचा मुद्दा ठरला आहे. तरीही महाराष्ट्राने सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आत्तापर्यंत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही राज्याने लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्राची संख्या सर्वाधिक आहे. तसेच राज्यात १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांचेही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या वयोगटातल्या १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. त्यामुळे मोठ्या संख्येने १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लसीकरणासाठी पात्र ठरले. राज्यात लसींचे डोस अपुरे पडू लागले आहेत. मात्र, तरीदेखील राज्य सरकारने लसीकरणामध्ये अव्वल कामगिरी केली आहे.
Previous Articleगरजू रुग्णांना कोरोना औषधे मोफतसाठी तजवीज करा – आ. विनय कोरे
Next Article कर्नाटकने पश्चिम महाराष्ट्राचा ऑक्सिजन रोखला








