16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून आचरला जातो. बाळ जन्माला आलं की घरच्यांच्या लाड आणि प्रेमाने अगदी न्हाऊन निघतं. मात्र बाळाचं आरोग्य सांभाळणं हे कुटुंबाचं मुख्य कर्तव्य असतं. बाळाचा जन्म झाल्यावर त्याचं आयुष्य सुरक्षित आणि सुखरूप पार पडावं अशी प्रत्येक जन्मदात्या पालकांची इच्छा असते. त्यादृष्टीने बाळाच्या सुरक्षेसाठी सर्वांत महत्त्वाचा उपाय करायला हवा, हा उपाय म्हणजे लसीकरण.
जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण. पण याचसोबत पुढचा टप्पा येतो तो खऱया लसीकरणाचा. यामुळेच आजारावर नियंत्रण मिळवता येते, आजाराची तीव्रता कमी करता येते. प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात किंवा त्या जंतूंचा अंश असतो.
सहज उपलब्ध असलेल्या रोगप्रतिकारक लसींचा वापर न केल्यामुळे दरवषी 1.7 दशलक्ष मुले विविध रोगांना बळी पडतात. लसीकरण केलेल्या मुलामुलींचा अशा प्राणघातक रोगांपासून किंवा त्यांच्यामुळे उद्भवणाऱया विकृतींपासून बचाव होतो. लसीकरण मिळणे हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे. प्रत्येक मुलामुलीचे लसीकरण करणे गरजेचे आहे. गर्भवतीचे व तिला होणाऱया बाळाचे धनुर्वात उर्फ टिटॅनसपासून रक्षण होण्यासाठी लसीकरण आवश्यक असते.सर्व पालकांना, बाळाचे लसीकरण कशासाठी, केव्हा, कोठे व कसे करावे ह्याची माहिती असायला हवी. मूल आजारी असेल, त्याला काही व्यंग असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित आहे ही बाब पालकांना माहीत असणे गरजेचे आहे.
प्रत्येक कुटुंबास लसीकरणासंबंधीची खालील माहिती मिळण्याचा हक्क आहे.
लसीकरण त्वरित केले पाहिजे. बाळाला त्याच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षामध्येच लसीकरण मालिकेची गरज असते.
लसीकरणामुळे कित्येक गंभीर आजारांपासून बचाव होतो. लसीकरण न झालेले बाळ जास्त वेळा आजारी पडते त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते किंवा पोषण न मिळून त्याचे मरणदेखील ओढवू शकते.
मूल आजारी असले, त्याला काही अपंगत्व असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित असते.
गर्भवतीचे व तिला होणाऱया बाळाचे धनुर्वात उर्फ टिटॅनसपासून रक्षण करणे आवश्यक आहे. अशा स्$ााrचे लसीकरण पूर्वी झालेले असले तरी ही तिला जादा टिटॅनस टॉक्सॉइड लसीकरणाची गरज असू शकेल. हे लसीकरण व त्यासंबंधीच्या सल्ल्यासाठी आरोग्य सेवकाला भेटा.
प्रत्येक लसीकरणासाठी नवीन किंवा निर्जंतुक केलेली सुईच वापरा. सर्वांनीच हे ध्यानात ठेवावे असा आग्रह धरावा.
लोकांच्या गर्दीमधून आजार लवकर पसरतात. दाट लोक वस्तीत, विशेषतः निर्वासितांच्या कॅम्पमध्ये किंवा नैसर्गिक आपदा स्थितीमध्³ाs राहणाऱया सर्व मुलामुलींचे लसीकरण तातडीने केले गेले पाहिजे. गोवराच्या प्रतिरोधासाठी हे अधिक महत्वाचे आहे.









