ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय लष्करातील जवानांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षापर्यंत करण्याचे संशोधन लष्कराच्या तिन्ही दलांकडून करण्यात येत असल्याची माहिती ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपीन रावत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्करातील जवान सध्या 17 वर्षांच्या सेवेनंतर अंदाजे 38 व्या वर्षी निवृत्त होतात. त्यांना पुढे सरासरी 30-32 वर्षापर्यंत पेन्शन मिळते. त्यामुळे त्यांना पुढील आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लष्कराचे अधिकारी वयाच्या 58 व्या वषी सेवानिवृत्त होतात. या वयापर्यंत त्यांची मुले सेटल होतात किंवा सेटल होण्याच्या मार्गावर असतात. त्यामुळे अधिकाऱयांना फार समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.
त्यामुळे जवानांची सेवेतील वयोमर्यादा वाढविण्याचा विचार तिन्ही दलांकडून सुरू आहे. त्यासाठी संशोधनही सुरू करण्यात आले आहे. 38 वर्षापर्यंत देशसेवा करुन जवानांना पुढे 20 वर्षापर्यंत पेन्शन देता येईल का, याचा विचार सुरू असल्याची माहिती रावत यांनी दिली.









