ओनलाईन टीम/तरुण भारत
आफ्रिकेतील (africa) सुदान (sudan) या देशात लष्कराने (military) मोठे बंड केले आहे. सुदानचे पंतप्रधान अबदुल्लाह हामडोक (prime minister abdalla hamdok) यांना सोमवारी लष्करातील काही अधिकाऱ्यांनी कैद केल्याची माहिती समोर येत आहे. सुदानमधील अल हादत टीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिलीय. लष्करी अधिकाऱ्यांनी हे बंड का पुरकारलं आहे आणि नक्की या मागील कारण काय आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
ही माहिती समोर आल्यानंतर इतर कोणत्याही सरकारी किंवा इतर संस्थांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. तर रॉयटर्सला मिळालेल्या माहितीनुसार लष्करामधील काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांच्या घरी बळजबरीने प्रवेश करत त्यांना ताब्यात घेतल्याचं सुत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. तसेच लष्कराने इतर मंत्र्यांनाही ताब्यात घेतलं आहे यात औद्योगिक मंत्री इब्राहिम अल शेख आणि सुदानची राजधानी असणाऱ्या खार्तुमचे राज्यपाल आयमन खलिद यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
तसेच सुदान लष्कराने इतर अनेक सरकारी पदाधिकाऱ्यांनाही लष्कराने ताब्यात घेतलं आहे. तर सरकारी अधिकाऱ्यांनी असोसिएट प्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारच्या प्रवक्त्यांना लष्कराने ताब्यात घेतलं आहे.









