नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारा ट्विटर संदेश प्रसारित केला आहे. ‘देशाचे पंतप्रधान या नात्याने आपण अजोड कामगिरी करत आहात. मी कोरोना संकटामुळे आपल्याला राखी पाठवू शकले नाही. मात्र संदेशरूपी शुभेच्छा देत आहे, असा आशय या संदेशात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या शुभेच्छांसंबंधी लता मंगेशकरांचे आभार मानले आहेत. आपल्या भावोत्कट संदेशामुळे मला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. अशा संदेशांमुळे साऱयांनाच प्रेरणा मिळेल आणि देश प्रगतीची नवी उंची गाठेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्या उत्तररूपी संदेशात व्यक्त केला आहे.









