ऑनलाईन टीम / बर्न :
लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या सरकारच्या निर्णयाला स्वित्झर्लंडमधील नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे स्वित्झर्लंड सरकार 27 सप्टेंबरला जनमत घेऊन लढाऊ विमाने खरेदीबाबतचा पुढील निर्णय घेणार आहे.
स्वित्झर्लंड सरकारने यूरोफायटर किंवा राफेल विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 500 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची तयारीही सरकारने ठेवली. मात्र, देशवासीयांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. स्वित्झर्लंड नेहमीच इतर देशांपासून अलिप्त असतो. तो कोणत्याही देशाचे समर्थन अथवा विरोध करत नाही. मग लढाऊ विमानांची गरज काय?, असा प्रश्न देशवासीयांनी उपस्थित केला आहे.
नेहमीच इतर देशांपासून तटस्थ राहिलेल्या स्वित्झर्लंडने 173 वर्षांच्या इतिहासात एकही युद्ध केले नाही. 1948 मध्ये बाहेरून आक्रमण होण्याच्या भीतीने या देशाची सेना शेवटची सीमेवर तैनात केली गेली होती. त्यामुळे इतर लढाऊ विमाने आणि रणगाडे असताना नवीन लढाऊ विमाने नकोत, असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.









