फिंगर-4 मध्ये चिनी सैनिकांपेक्षा उंचीवर पोहोचले भारतीय सैनिक
नवी दिल्ली, लडाख / वृत्तसंस्था
पूर्व लद्दाखमधील पांगोंग तलावाच्या उत्तरेकडील भाग म्हणजेच फिंगर भागात आता भारतीय सैन्य अतिउंचीवर पोहोचले आहे. चिनी सैनिक येथे फिंगर-4 च्या शिखरावर पोहोचले होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आता भारतीय सैन्याने तिथे चीनच्या उंचीपेक्षाही अधिकची उंची गाठत आघाडी घेतली आहे. भारतीय सैन्याने व्यापलेली जागा फिंगर-4 पेक्षा अतिउंचीची आहे. भारतीय सैन्याने ही उंची गाठल्याने आता चीनची अधिक कोंडी होऊ शकते.
सोमवारी चीनच्या सैन्याने दक्षिणेकडील पेंगाँगची भारतीय फॉरवर्ड पोस्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी, तलवारी आणि स्वयंचलित रायफल घेऊन आलेल्या चिनी सैनिकांनीही भारताचे लोखंडी कुंपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पेंगाँग तलावाच्या दक्षिण किनाऱयावर भारतीय सैनिक तैनात असलेल्या उंचीवर भारतीय सैन्याने आपल्या भागात वायर ऑप्टिकल तैनात केले आहेत. त्यांनी हा बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असा कडक इशारा भारताने चिनी सैनिकांना दिला आहे. यादरम्यान चिनी सैन्याने हवेत गोळीबार केला आणि भारतीय सैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैनिकांच्या कडक इशाऱयानंतर त्याला माघार घ्यायला भाग पाडले गेले.
दबाव निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न
चीन रणगाडे तैनात करून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनने पँगोंग सरोवराच्या दक्षिणेकडील स्पंगूर गॅपजवळ जवळपास 15-20 रणगाडे तैनात केले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. चीन भारतीय सैनिकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण भारतीय सैन्य प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
मॉल्डो येथे चीनचे सुमारे 5-7 हजार सैनिक
चुशुल सेक्टरच्या विरुद्ध असलेल्या चीनने आपल्या मॉल्डो क्षेत्रात सुमारे 5 ते 6 हजार सैनिक तैनात केले आहेत. मात्र भारतीय सैन्याने त्यांच्याइतकीच तयारी केली आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीत त्यांच्यापेक्षा कमी नाही. भारतीय सैन्य तैनात असलेल्या उंचीवरून चीनच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवता येते, असे भारतीय अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
भारत-चीन ब्रिगेड कमांडरची भेट
एलएसीवर तणावाची स्थिती असली तरी चर्चेच्या फेऱया अद्याप थांबलेल्या नाहीत. तणावाच्या स्थितीत दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडर्सची पुन्हा चुशूल येथे भेट झाली आणि ही बैठक सुमारे चार तास चालली. आम्हाला संवादाचा मार्ग थांबवायचा नाही परंतु परिस्थितीनुसार कोणतेही पाऊल उचलण्यास आम्ही सक्षम आहोत, अशी माहिती एका वरि÷ अधिकाऱयाने दिली.
ताबारेषेवर ‘स्फोटक’ स्थिती
गलवान खोऱयातील धुमश्चक्रीनंतर पूर्व लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरूच आहेत. रेझांग-ला येथील मुखपरीजवळ भाले, लोखंडी शिगा आणि अन्य शस्त्रे हाती घेतलेल्या चिनी सैन्याने भारतीय जवानांना चिथावणी दिली. भारताचा भूभाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न जवानांनी पुन्हा हाणून पाडला असून, प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थिती स्फोटक बनली आहे.
प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारतीय लष्कराच्या चौक्मयांच्या जवळ आले होते. त्यांनी भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याने माघार घेतली. मात्र, माघारी फिरताना चिनी सैन्याने गोळीबाराच्या 10 ते 15 फैरी हवेत झाडल्या, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. भारतानेच प्रत्यक्ष ताबारेषेचे उल्लंघन करून गोळीबार केल्याचा दावा चीनने केला होता. तो फेटाळून भारतीय लष्कराने चीनचा कांगावा उघड केला.
हेरगिरीसाठी चीनने भारतात पाठवले याक?
भारत आणि चीनदरम्यानचा सीमा विवाद शांत होण्याची शक्मयता दिसत नाही. सीमेवर तणाव असतानाच लडाखमध्ये एका घटनेने भारतीय लष्कराचे लक्ष वेधून घेतले.. तणाव असतांनाही वाद चिघळणार नाही याची काळजी भारत घेत आहे. चिनी भागातून अरुणाचल सीमा पार करून चीनचे 13 याक आणि 4 पिल्ले भारतीय हद्दीत आले होते. भारतीय लष्कराने तपासणी व शहानिशा केल्यानंतर त्या सगळय़ांना चिनी लष्कराकडे सुपूर्द केले. त्यामुळे चिनी लष्कराने भारताचे आभारही मानले आहेत. सदर याकना चीनच्या स्वाधीन करण्यापूर्वी भारतीय लष्कराने मोठा निर्णय घेत हेरगिरीचा संशय आल्याने सखोल तपासणी केली होती. भारताने या सगळय़ा प्राण्यांच्या अनेक चाचण्या केल्या. एक्स रे काढले. सर्व अहवाल मिळाल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यानंतरही काही दिवस वाट पाहून हे याक परत करण्याचा निर्णय झाला. भारतीय अधिकाऱयांनी हे य सर्व याक चिनी अधिकाऱयांकडे सोपवले आणि मित्रत्वाचा संदेशही दिला.









