आपल्या आर्थिक-औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, लघुउद्योगाचे स्थान मोठे आणि परिणामकारक ठरते. देशाच्या एकूण आर्थिक जीडीपीमध्ये लघुउद्योगांचे योगदान 30 ते 35 टक्के आहे. विख्यात व्यवस्थापन सल्लागार संस्था ‘केपीएमजी’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या विशेष अहवालानुसार, देशातील एकूण व्यापार-उदिमांमध्ये ‘एमएसएमई’चा वाटा 36 टक्के, उत्पादन प्रक्रियेत 31 टक्के, तर इतर उद्योग-व्यवहारात ‘एमएसएमई’चे प्रमाण 33 टक्के आहे. या आकडेवारीनुसार परंपरागतरित्याच नव्हे, तर प्रचलित म्हणजेच कोरोनानंतरच्या आर्थिक-व्यावसायिक आव्हानपर स्थितीत ‘एमएसएमई’ क्षेत्रापुढील आव्हानांची व्यापकता स्पष्ट होते.
या संदर्भातील एक प्राथमिक, पण महत्त्वपूर्ण तथ्य म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार हा आपल्या आर्थिक उलाढालीच्या वर्षाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच अखेरच्या तिमाहीत झाला आहे. याच टप्प्यात प्रमुख उद्योग व ‘एमएसएमई’ उद्योगांच्या ग्राहकांकडून त्यांचे उत्पादन व सेवा या संदर्भात सर्वाधिक मागणींसह उलाढाल असते. ही पूर्वापार चालत आलेली व्यवसाय प्रथा आहे. नेमक्मया याच वेळी कोरोनाचा जागतिक स्तरावर प्रादुर्भाव होणे म्हणजे लघुउद्योजकांच्या संदर्भात सांगायचे तर, शेतकऱयाच्या कापणीला आलेल्या पिकावर अवकाळीची अवकळा यावी, अशाच प्रकारची दुर्दैवी स्थिती निर्माण होण्यासारखे आहे.
या पार्श्वभूमीवर ‘एमएसएमई’ क्षेत्राने स्वतःला सावरून स्थिर व यशस्वी होण्याचे आव्हान मोठे आहे. मात्र, हे मोठे आव्हान कठीण असले तरी अशक्मय मात्र नाही. याची परिश्रम आणि प्रयत्नपूर्वक खातरजमा करण्यासाठी खालील मुद्यांचा क्रियाशील स्वरुपात विचार व अंमलबजावणी करणे अगत्याचेच नव्हे, तर अपरिहार्य ठरते.
कोरोनामुळे जनसामान्यांच्या जीवनाप्रमाणेच व्यावसायिक गरजा आणि परिस्थितीत कुठले आणि कसे व कितपत बदल झाले आहेत, याचा मागोवा ‘एमएसएमई’ने घेणे गरजेचे आहे. हे बदल आणि त्यांचे स्वरुप तपशिलासह जाणून घेतल्यास कोरोनामुळे नेमकी कोणती व्यावसायिक आव्हाने मुख्य उद्योग व लघुउद्योजकांपुढे निर्माण झाली आहेत, याचा नेमका तपशील व कल्पना येऊ शकेल. या बदलत्या तपशिलानुरूप संबंधित लघुउद्योगाने कोरोनापूर्व व त्यानंतरच्या व्यावसायिक गरजानुरूप व बदलत्या वस्तुस्थितीच्या आधारे वस्तुनि÷ आकलन करून आपापल्या लघुउद्योगाची नवी आखणी-उभारणी करणे आज लघुउद्योजकांसाठी उपयुक्त ठरू शकते.
कोरोनामुळे लघु व मध्यम उद्योगांपुढे जी आव्हानपर स्थिती निर्माण झाली आहे, त्यामध्ये आर्थिक, व्यावसायिक, वैचारिक, औद्योगिक, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक संदर्भातील आव्हानांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. वर नमूद केलेल्या जोखमींचे प्रकार हे प्रातिनिधिक व निवडक स्वरुपाचे समजले जावेत. या प्रकरणी प्रत्येक वा संबंधित जोखमीचे स्वरुप आणि परिणाम याचा अभ्यास संबंधित उद्योग व लघुउद्योजकाने करून त्या अनुरूप उपाययोजना करणे फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे जोखमींची तपशीलवार हाताळणी करून त्यानुसार विशेष उपाययोजना केल्यास कोरोनामुळे निर्माण झालेल्या ‘एमएसएमई’ क्षेत्राशी संबंधित आव्हानांवर अल्पावधीत व यशस्वीपणे मात करता येईल.
प्राप्त परिस्थितीत अगदी अनपेक्षित व अकल्पतिपणे घडून आलेल्या व्यावसायिक बदलांचे परिणाम आज औद्योगिक क्षेत्रातील लहानमोठय़ा सर्वच उद्योगांवर अपरिहार्यपणे झाले आहेत. या बदलांमुळे निर्माण झालेली आव्हाने ही प्रामुख्याने व्यावसायिक अकल्पित, अनपेक्षितपणे घडून आलेले फार मोठे बदल, उद्योग-व्यवसायचक्राला बसलेला मोठा धक्का, प्रचंड आर्थिक फटका, व्यावसायिक प्रश्नचिन्ह, प्रचलित व्यवसायांना बसलेली खीळ, उद्योग-व्यवसायाची फेरमांडणी, तंत्रज्ञान प्रक्रिया, सेवामध्ये करावे लागलेले मोठे बदल, मुख्य उद्योग वा ग्राहकांच्या बदलत्या गरजा, सरकार वा वित्तीय संस्थांची नवी धोरणे, उद्योगाला पूरक असा कच्चा माल, प्रक्रिया, वाहतूक, विक्रीमध्ये करावे लागणारे बदल, बदलत्या व्यावसायिक व प्रक्रियाविषयक गरजांनुरूप कर्मचारी-कामगारांची कौशल्यक्षमता व ‘एमएसएमई’च्या संदर्भात महत्त्वाचे म्हणजे संबंधित उद्योजकाची निर्णयक्षमता व मानसिकता संदर्भात व व्यापक स्वरुपात अपरिहार्यपणे दिसणार आहेत. आता लघुउद्योजकांनी प्राधान्य तत्त्वावर करण्यासारखे म्हणजे सर्वस्वी निराश न होता, त्यांनी वर नमूद केलेल्या बदलांपैकी त्यांच्या उद्योग-व्यवसायावर कशाचा व कितपत परिणाम झाला, या बदल वा परिणामांच्या तीव्रतेची मोजणी करावी. नेमके काय, कसे आणि कशा प्रकारचे निर्णय घ्यायला हवे, त्याचा वस्तुनि÷ पण व्यावहारिक ऊहापोह केल्यास त्याचा फायदा सहजपणे होऊ शकतो. या उपाययोजनांना व्यावसायिक नेतृत्वाची नेमकी जोड देण्यासाठी ‘एमएसएमई’ क्षेत्रातील उद्योगांनी कोरोनाच्या या संकटानंतर आपण केवढे गमावले, त्याच्याच जोडीला अद्यापही काय सक्षम व शाबूत आहे, यादृष्टीने विचार करणे उद्योजकांसाठी महत्त्वाचे ठरेल.
संभाव्य परिणामांची उजळणी करून व्यवसाय आखणी कोरोनामुळे मुख्य उद्योगांसह त्यांचे ग्राहक व त्यांच्यासाठी पूरक पण महत्त्वाच्या स्वरुपाचे काम करणार या लघुउद्योगांवर व त्यांच्या व्यवसायावर झालेल्या परिणामांचा आढावा उजळणी स्वरुपात घेणे आवश्यक व महत्त्वाचे ठरते. या आढाव्यावर आधारित व्यावसायिक भूमिका घेणे व त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे त्यांच्याच हिताचे ठरणारे आहे. यामध्ये सध्या, नजीकच्या काळात व त्याचप्रमाणे नंतर होऊ शकणारे व्यावसायिक परिणाम, या परिणामांना सामोरे जात असतानाच त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी धोरणात्मक, तांत्रिक, प्रक्रियाविषयक, उत्पादनाशी निगडित, ग्राहकांच्या बदलत्या व नव्या गरजांची पूर्तता सक्षम व कार्यक्षमपणे करणे व त्याला आर्थिक धोरण-नियोजनाची नव्या संदर्भासह जोड देणे व या गरजांनुरूप आपल्या उद्योग-व्यवसायाची नव्याने आखणी करणे आता ‘एमएसएमई’ क्षेत्रासाठी अपरिहार्य ठरले आहे.
कोरोनानंतरच्या बदलत्या काळानुरूप आपले उत्पादन आणि उत्पादन प्रक्रियेत अल्पावधीत व व्यापक बदल करून वाहन आणि त्यांच्या उपकरणांच्या जागी व्हेंटिलेटर्सचे उत्पादन सुरू करणे ही एकच बाब बदलत्या व्यावसायिक स्थितीची परिचायक ठरते. हे बदल करणे, आत्मसात करणे व त्यांची अंमलबजावणी यशस्वीपणे व परिणामकारक पद्धतीने करण्याचे काम आवश्यक, गरजेचे, आव्हानपर व म्हणूनच व्यावसायिक जोखमीचे ठरणार आहे.
नव्यानेच सर्वांनी अनुभवलेल्या कोरोनाच्या सार्वत्रिक परिणामांना व्यावसायिक-औद्योगिक संदर्भात लघुउद्योजकांना ज्या मोठय़ा संकटांना सामोरे जावे लागले, त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वच ‘एमएसएमई’ घटकांना उभ्या ठाकलेल्या समस्या आणि आव्हानांना सामोरे जाणे अपरिहार्य असून त्यावर मात करणे आवश्यक आहे. यातच लघुउद्योगांचेच नव्हे, तर त्यांच्या सक्रियतेवर अवलंबून असणाऱया मूळ व मोठय़ा उद्योगांसाठी आर्थिक-औद्योगिक संदर्भात फायदेशीर
ठरेल.
दत्तात्रय आंबुलकर









