होणार आहे.
सेक्रेटरी जगदीश कुंटे यांनी सांगितले की, टिंकरिंग याचा शब्दशः अर्थ मोडतोडजोड. अशा कारभारातूनच मुले शिकत असतात. अशा शिकण्याला वाव मिळाला तर त्यातूनच पुढे नवे शास्त्रज्ञ तयार होतील.
प्रा. प्रवीण पाटील यांनी त्यांच्या ‘Seelablet’ या संकल्पनेची माहिती दिली. त्याचबरोबर या संकल्पनेचे छोटे स्वरुप म्हणजे ‘EXPEYES’ चे प्रात्यक्षिक करून दाखविले. छोटय़ा छोटय़ा बिनखर्चिक वस्तू वापरून नवनवे प्रयोग कसे करता येतील याची माहितीही प्रा. पाटील यांनी दिली.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी लॅब
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱया या लॅबमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅग्नेटिक, साऊंड तसेच सॉईल टेस्टिंगची साधने उपलब्ध आहेत. मुलांचा आवडता विषय म्हणजे रोबोटिक्स याची सुविधा आहे. ऑडिओ-व्हिज्युअल लर्निंग सेंटर आणि विविध वर्क स्टेशन्स तसेच थ्रीडी प्रिंटिंग करण्याची साधने आहेत. नव्या शिक्षण प्रणालीसाठी ही प्रयोगशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या प्रयोगशाळेची उभारणी निरंजन देसाई यांनी केली आहे. त्यांना शाळेचे विज्ञानशिक्षक मारुती अंबाजी, महादेव गुरव आणि सेव्हिल मार्क यांचे सहकार्य आणि प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी संचालक अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, गिरीधर रविशंकर, मुख्याध्यापिका मंजिरी रानडे आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.









