चिकोडी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील एका तरुणीवर चिकोडी येथे बलात्कार करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून चिकोडी येथील एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली असून या संबंधी चिकोडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एका 26 वषीय तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या संबंधी चिकोडी पोलीस स्थानकात भा.दं.वि. 376, 417, 323, 504, 506 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार त्या 26 वषीय तरुणीसोबत चिकोडी येथील प्रशांत विष्णू जाधव हा तब्बल एक ते दीड वर्षे बेळगावात संसार थाटला होता. नंतर तिला चिकोडीला बोलावून घेतले होते. लग्नाचा विषय काढताच तीला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. चिकोडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









