नवी दिल्ली
रसायन क्षेत्रात कार्यरत कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक आयपीओच्या माध्यमातून 800 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रसायन निर्मितीच्या क्षेत्रातील कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक येणाऱया काळात आपला आयपीओ बाजारात सादर करण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला साधारणपणे 800 कोटी रुपये जमवायचे आहेत. या आधीच्या काळामध्ये रसायन कंपन्या जशा की रॉसारी बायोटेक आणि केमकॉन स्पेशलिटी केमिकल्स यांनीही अशाप्रकारे आयपीओद्वारे बाजारात यश मिळवलं होतं. आयपीओ सादर करण्यासंदर्भात कंपनीने आपला अर्ज शेअर बाजारातील नियामक सेबीकडे दाखल केला आहे.









