प्रतिनिधी / वारणानगर
बदलत्या राजकीय घडामोडीत स्वाभिमाणी शेतकरी संघटनेची लंगडी बाजू सावरण्यासाठीच स्वाभिमाणीचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांचा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर काढण्याऐवजी झालेल्या चुकांचे शुध्दीकरण कसे होऊन संघटना पुर्वीप्रमाणे काम कसे करेल यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा सातवे ता. पन्हाळा येथील स्वाभिमाणीचे जेष्ठ कार्यकर्ते वसंतराव पाटील यानी व्यक्त केली आहे.
देशातील सर्वच शेतकरी एकाच छताखाली आणून शासनावर दबाव निर्माण करून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी खा. राजू शेट्टी यांना स्वत्ता:च्याच स्वाभिमानी पक्षातील नाराजीने अनेकजन बाहेर पडले ते सर्वजन चांगलेच कार्य करीत होते त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे तथापी ते गेलेल्या ठिकाणी किती महत्व आहे त्यानी मागे वळून पहायला पाहिजे आज टिका करण्यापेक्षा सुधारणा काय करायला हव्यात हे गेलेल्यानी सांगायला हवे अशी अपेक्षा वसंतराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
संघटना सर्वांची आहे बहुजन शेतकऱ्यांकडून अजूनही राजू शेट्टी यांच्याकडून अपेक्षा आहेत शासन स्तरावर प्रतिनिधीत्व करायला गेल्यावर हक्काने अनेक प्रश्न मार्गी लावले जातात यासाठी बदलत्या राजकीय समीकरणात राजू शेट्टींनी आमदारकी स्वीकारली यात गैर नाही शासन स्तरावर . संघटनेचे आज कुठेही प्रतिनिधीत्व नाही याचा विचार प्रथम व्हायला पाहिजे त्याच्यावर टिका करण्यापेक्षा फाडापाडी व खाली पाडण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी सर्वानी शुद्धीकरण करायचा मार्ग सांगायला पाहीजे असे वसंतराव पाटील यानी सांगितले.








