वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा वेगवान गोलंदाज इसुरू उदानाने शनिवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. नवोदित खेळाडूंना योग्यवेळी संघात स्थान मिळावे यासाठी आपण निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे उदानाने म्हटले आहे.
33 वर्षीय उदानाने 21 वनडे आणि 35 टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व करताना क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारात 45 बळीं मिळविले आहेत. नुकत्याच झालेल्या भारताबरोबरच्या वनडे मालिकेत एका सामन्यात खेळताना त्याला एकही गडी बाद करता आला नाही. लंकन क्रिकेट मंडळाने उदानाला त्याच्या पुढील भाविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









