वृत्तसंस्था/ वेंलिग्टन
सध्या विंडीजचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने विंडीजचा डावाने पराभव केला. आता उभय संघात होणाऱया दुसऱया कसाटीसाठी विंडीजचा वेगवान गोलंदाज केमर रोश आणि यष्टीरक्षक डॉरिच उपलब्ध होवू शकणार नाहीत. विंडीजचे हे दोन्ही क्रिकेटपटू मायदेशी रवाना झाले आहेत.
हॅमिल्टनमधील पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी रोश याच्या वडिलांचे निधन झाले होते. रोश आता काही दिवस आपल्या कुटुंबियासमवेत राहणार असल्याने तो मायदेशी परतला आहे. तसेच यष्टीरक्षक डॉरिचला दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. पहिल्या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. दरम्यान काही वैयक्तिक कारणामुळे डॉरिच मायदेशी जाणार असल्याची माहिती विंडीजचा कर्णधार होल्डरने दिली आहे. आता दुसऱया कसोटीसाठी विंडीज संघामध्ये नवोदित यष्टीरक्षक डीसिल्वाचा समावेश करण्यात आला आहे.









