वृत्तसंस्था / रोम
पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू तसेच ज्युवेंट्स क्लबकडून आघाडीफळीत खेळणारा ख्रिस्टीयानो रोनाल्डोची 2019-20 च्या फुटबॉल हंगामातील सिरीए फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
इटालियन फुटबॉलपटूंच्या संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या या पुरस्कारासाठीच्या मतदानामध्ये रोनाल्डोला अधिक मते मिळाली. गेल्यावर्षीच्या फुटबॉल हंगामात ज्युवेंट्स क्लबने सिरीए फुटबॉल स्पर्धा सलग नऊवेळा जिंकली आहे. त्याचप्रमाणे ऍटलांटाचे प्रशिक्षक गॅसपेरीनी यांनी 2019-20 च्या फुटबॉल हंगामातील सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार मिळविला आहे.









