प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब बेळगाव दर्पणतर्फे 3 डिसेंबर रोजी केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे ब्लड बँकेच्या सहकार्याने बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास दिवंगत आमदार संभाजी पाटील यांच्या स्नुषा साधना पाटील तसेच पॅटसन चिटफंड यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरात 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये 50 टक्के महिलांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे उद्घाटन साधना पाटील यांनी दीपप्रज्वलन करून केले. रोटरी दर्पणच्या अध्यक्षा रो. शीतल चिलमी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. केएलईचे डॉ. विठ्ठल माने यांनी रक्तदानाविषयी माहिती दिली.
याप्रसंगी रोटरीचे उपप्रांतपाल रो. डॉ. मनोज सुतार तसेच क्लबचे जीएसआर रो. महेश अनगोळकर आणि पॅटसन समुहाच्या रो. आशा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. आभार प्रदर्शन रो. संगीता नांदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. कोमल कोलीमठ यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. नेत्रा सुतार तसेच केएलईचे संपर्क अधिकारी एस. व्ही. विरागी आणि केएलईचा वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी दर्पणच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.









