प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव व जनसेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संत मीरा येथे 2000 जणांचे मोफत लसीकरण करण्यात आले. हा कार्यक्रम झेरोदा ग्रुपने पुरस्कृत केला आहे. प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत 2 हजारांहून अधिक जणांना लस देण्यात आली. यासाठी स्पर्श हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता. उद्घाटनप्रसंगी क्लबचे अध्यक्ष डॉ. के. एम. केळूसकर, सचिव गणेश देशपांडे, रोटे. अल्पेश जैन, सचिन सबनिस, परमेश्वर हेगडे, कृष्णानंद कामत, डॉ. सचिन माऊली, मिलिंद पाटणकर, बसवराज विभुते आदी उपस्थित होते. या उपक्रमाला खडेबाजार येथील व्यापारी सुनील नाईक, विजय पोरवाल, मुकेश पोरवाल यांचे सहकार्य लाभले.









