प्रतिनिधी/ बेळगाव :
कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे दररोज काम करून पोट भरणाऱया रोजंदारी कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटकाळात त्यांना मदत करणे हे कर्तव्य समजून चन्नम्मानगर येथील निवृत्त कॅप्टन एम. डी. गायकवाड यांनी 70 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.
दररोज काम करून आपला उदरनिर्वाह करत असताना कोरोनामुळे या कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. निवृत्त कॅप्टन गायकवाड यांनीही एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो पोहे, एक किलो साबुदाणा, एक किलो बेसण असे साहित्य दिले.
भवानीनगरमधील शिवाजी रोड चौथा क्रॉस येथील गरीब कुटुंबांना हे साहित्य देण्यात आले. संकटाच्या काळात मदत केली केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.









