बेळगाव : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱया वषीही सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने त्याचा परिणाम सामान्य जनतेवर झाला. प्रामुख्याने रोजंदारी कर्मचाऱयांना मोठाच फटका बसला. हे लक्षात घेऊन सम्राट अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली मित्रमंडळातर्फे रोजंदारी कर्मचाऱयांना अन्नधान्याचे किट वितरित करण्यात आले. या मदतीबद्दल कर्मचाऱयांनी समाधान व्यक्त केले. मंडळाचे सदाशिव देशपांडे, नारायण जोशी, कपिल व अनिल नारळीकर, विश्वेश आंबेवाडकर, विशाल कडवाडकर, बाळू नावले व कांचन मेसचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
Previous Articleजैन पत्रकार महासंघाच्या विभागीय संयोजकपदी कलमनी यांची निवड
Next Article जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









