ऑनलाईन फूड डिलिक्हरीसाठी 5 लाख रेस्टॉरन्ट जोडलेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) टेक्नालॉजी प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर असोसिएशन स्विगी आणि झोमॅटो सारख्या फूट ऍग्रीगेटर्सवर अवलंबून राहवे लागते. यांच्यासाठढी ऑनलाईन ऑर्डर, फूट डिलिव्हरी, लॉयल्टी प्रकल्प आणि कॉन्टॅक्टलेस डायनिंग यासारख्या पर्यायाची सुविधा आणण्याची तयारी करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
देशभरात जवळपास 5 लाखापेक्षा अधिकची रेस्टॉरन्टचे प्रतिनिधीत्व करणारी रेस्टॉरन्ट असोसिएशनकडून हा मार्ग सुरु करण्यात येणार आहे. कारण देशभरातील रेस्टॉरन्ट उद्योगाला मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर असोसिएशन आपल्या व्यवहारात बदल करण्याचा विचार केला जात आहे. यात एनआरएआयचे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी दिलेल्या माहितीनुसार डिजिटल मार्गाचा वापर करुन आगामी काळात रेस्टॉरन्ट उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
लवकरच व्हॉटअप फेसबुकसोबत
येत्या काळात अन्न पुरवठा करण्यासाठी लॉजिस्टीक कंपन्यांसोबत रेस्टॉरन्ट असोसिएशन करार करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सोशल मिडीयातील व्हॉटसअप व फेसबुक यांच्यासोबत हा व्यवसाय जोडण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.









