प्रतिनिधी /मडगाव
‘मंगला एक्सप्रेस’मधून 8,000 रुपये किंमतीचा ऐवज असलेली एक बँग खेचून नेलेला आणि नंतर पोलिसांनी अटक केलेल्या बरकत अली या राजस्थान राज्यातील आरोपीला न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधा वासुदेवन ही महिला आपल्या पतीसमवेत केरळहून महाराष्ट्रातील कल्याण शहरात ‘मंगला एक्सप्रेस’ रेल्वेतून जात होती. ही रेल्वे जेव्हा मडगाव रेल्वे स्थानकावर थांबली तेव्हा मूळ राजस्थान येथील बरकत अली या 32 वर्षीय आरोपीने या प्रवासी महिलेची बँग खेचून पळ काढला होता. आरोपीही याच ‘मंगला एक्सप्रेस’मधून प्रवास करीत होता. पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा तपास करुन आरोपीला अटक केली होती. अनेक दिवस कोठडीत असलेल्या या संशयित आरोपीला न्यायालयाने सोमवारी जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.









