नवी दिल्ली
रेडमी इंडियाने स्मार्ट टीव्हींच्या क्षेत्रात प्रवेश केला असून यांचा एक्स सिरीजमधील रेडमी स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. स्मार्ट टीव्ही एक्स 65, एक्स 55 आणि एक्स 50 असे विविध प्रकारातील स्मार्ट टीव्ही सादर करण्यात आले आहेत. विविध आकाराच्या स्क्रीनच्या आकारात दाखल होणाऱया टीव्हींमध्ये 50 इंचाच्या टीव्हीकरीता 32 हजार 999 रुपये, 55 इंचाच्या टीव्हीकरीता 38 हजार 999 रुपये आणि 65 इंचाच्या टीव्हीकरीता 57 हजार 999 रुपये इतकी किमत आकारली जाणार आहे. मार्च 26 पासून दुपारी 12 नंतर सदरचे नवे स्मार्ट टीव्ही ऍमेझॉन आणि एमआयडॉटकॉम, एमआय होम आणि एमआय स्टुडियो यावर विक्रीकरीता उपलब्ध होणार आहेत.









