ः प्ले-ऑफमधील स्थान निश्चितीसाठी गुजरात सज्ज, पंजाबसमोर सांघिक खेळ साकारण्याचे आव्हान
नवी मुंबई / वृत्तसंस्था
आपल्या पदार्पणाच्या मोहिमेत जोरदार मुसंडी मारणाऱया गुजरात टायटन्सचा संघ आज (मंगळवार, दि. 3) या हंगामात झगडणाऱया पंजाब किंग्ससमोर मैदानात उभा ठाकेल, त्यावेळी प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करणे, हे त्यांचे मुख्य लक्ष्य असेल. गुजरातने आतापर्यंत 9 सामन्यात 8 विजय संपादन केले असून हाच विजयी धडाका आजही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. उभय संघातील ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
गुजरातचा संघ सलग सहाव्या विजयासाठी येथे प्रयत्नशील असेल. कठीण, प्रतिकूल परिस्थितीतूनही यशस्वी मार्ग काढता आल्याने त्यांना यंदा विजयी घोडदौड कायम राखता आली आहे. यापूर्वी, गुजरात-पंजाब यांच्यातील पहिल्या फेरीतील लढत राहुल तेवातियाने शेवटच्या 2 चेंडूंवर सलग 2 षटकार खेचत गाजवली होती.
पंजाबचा संघ 9 सामन्यात 5 पराभवांमुळे अडचणीत असून यामुळे विजयाच्या ट्रकवर परतणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कर्णधार मयांक अगरवालसह जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन यांनी काही टप्प्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. पण, सामने जिंकून देण्यासाठी सांघिक स्तरावरील कामगिरी पुरेशी ठरत आलेली नाही.
प्रत्येक सामन्यागणिक खेळ बहरत चाललेल्या पेसर अर्शदीप सिंगचा अपवाद वगळता अन्य गोलंदाज अद्याप अपेक्षित कामगिरी करु शकलेले नाहीत. अपवाद म्हणून मागील लढतीत गोलंदाजांनी चुणूक दाखवली. मात्र, फलंदाजांच्या अपयशामुळे संघाची पुन्हा निराशा झाली होती.
टायटन्स संघासाठी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा हा सध्या झगडणाऱया मॅथ्यू वेडसाठी उत्तम पर्याय ठरत आला आहे. त्याचा सहकारी सलामीवीर शुभमन गिलने अनेकदा आश्वासक सुरुवात केली असली तरी याचे तो मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकलेला नाही. कर्णधार हार्दिक पंडय़ा हा गुजरातसाठी फलंदाजीतील मुख्य आधारस्तंभ ठरत आला असून आश्चर्य म्हणजे हंगामात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत तो सोमवारच्या लढतीपूर्वी तिसऱया स्थानी राहिला. फक्त आरसीबीविरुद्ध लढतीत हार्दिक फलंदाजीत अपयशी ठरला होता.
तिसऱया स्थानावरील बी. साई सुदर्शन या संघासाठी दुबळी बाजू ठरत आली असून त्याला मिलरच्या साथीने अधिक जबाबदारीने खेळणे क्रमप्राप्त आहे. गुजरातसाठी अष्टपैलू रशिद खानने दोन्ही आघाडय़ांवर लक्षवेधी योगदान दिले असून त्याचे उत्तुंग षटकार खेचण्याचे कौशल्य या हंगामात प्रामुख्याने दिसून आले आहे. मिलर, तेवातिया व रशिद यांनी एकत्रित 28 षटकार खेचले असून आजही पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
गुजरातकडे एकापेक्षा एक असे अव्वल दर्जाचे गोलंदाज ताफ्यात असून नव्या चेंडूवर मोहम्मद शमी पंजाबच्या लाईनअपला सुरुंग लावण्यासाठी प्रयत्नशील असेल. याशिवाय, लॉकी फर्ग्युसनची विविधता शमीच्या गोलंदाजीला आणखी एकदा पूरक ठरु शकेल. 4 हंगामानंतर पहिलाच आयपीएल सामना खेळलेल्या प्रदीप संगवानने चमक दाखवली असल्याने त्याच्यावर पुन्हा विश्वास दर्शवला जाऊ शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाझ, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रविश्रीनिवास साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाल.
पंजाब किंग्स ः मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, कॅगिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, ऋतिक चटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन इलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्ष, बेन्नी हॉवेल.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7.30 वाaaa









